Ladki Bahin Yojana August Installment List : महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने जुलै २०२४ मध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात, जी रक्कम लवकरच २१०० रुपये केली जाणार आहे. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही किंवा तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे.
यादी तपासण्याची प्रक्रिया:
- स्टेप १: तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘नारी शक्ती दूत’ ॲप उघडा आणि लॉगिन करा.
- स्टेप २: डॅशबोर्डवरील “लाभार्थी अर्जदारांची यादी” या पर्यायावर क्लिक करा.
- स्टेप ३: तुमचा जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा आणि “शोधा” बटणावर क्लिक करा.
- स्टेप ४: त्यानंतर, तुम्हाला तुमच्या गावातील यादी दिसेल आणि त्यात तुमचे नाव आहे की नाही, हे तपासता येईल.
या योजनेसाठी पात्र महिलांना मासिक १५०० रुपये मिळतात. आतापर्यंत २.५ कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ मिळाला आहे. जर तुम्ही योजनेसाठी अर्ज केला असेल, तर वरील प्रक्रियेचा वापर करून तुम्ही तुमचे नाव यादीत आहे की नाही, याची खात्री करू शकता.
ऑगस्ट महिन्यांची यादी जाहीर चेक करण्यासाठी अधिकृत वेबसाईट येथे पहा: https://ladakibahin.maharashtra.gov.in/