‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. जुलै महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता महिला ऑगस्टच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सरकारने केलेल्या पडताळणीमध्ये काही महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याने त्यांना या महिन्याचा हप्ता मिळणार नाही.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेतून आतापर्यंत जवळपास ४२ लाख महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे बाद करण्यात आले आहेत. यापैकी २६ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत, आणि अजूनही अर्जांची तपासणी सुरूच असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
लाडकी बहिणी योजना अपात्रतेचे मुख्य निकष
योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही कठोर निकष ठरवले आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळू शकतो. खालील कारणांमुळे महिलांचे अर्ज बाद केले जात आहेत:
- वयाची अट: अर्जदार महिलेचे वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे.
- वार्षिक उत्पन्न: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त नसावे.
- सरकारी नोकरी: कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
- चारचाकी वाहन: कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे.
- करदाता: कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत नसावा.
पात्रता तपासा
ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी स्वतःची पात्रता पुन्हा एकदा तपासून पाहावी. अंगणवाडी सेविकांकडून अपात्र ठरलेल्या महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे. जर तुमचा अर्ज वरील कोणत्याही निकषात बसत नसेल, तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
तुम्ही पात्र आहात की नाही, हे तपासाण्यासाठी खालील बाबी लक्षात ठेवा:
पात्रता अट | निकष |
वय | २१ ते ६५ वर्षे |
उत्पन्न | कुटुंबाचे उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी |
सरकारी कर्मचारी | कुटुंबात कोणताही सरकारी कर्मचारी नसावा |
वाहन | कुटुंबाकडे चारचाकी वाहन नसावे |
करदाता | कुटुंबातील कोणताही सदस्य करदाता नसावा |
या अटींची पूर्तता न करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपल्या अर्जाची स्थिती अधिकृत स्त्रोतांकडून तपासा.