Namo Shetkari Yojana Installment Date: शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना’ (PM Kisan) आणि ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ (NSMNY) या दोन्ही योजनांद्वारे शेतकऱ्यांना वार्षिक ₹१२,००० चा लाभ मिळतो.
योजनेचा तपशील:
- पीएम किसान योजना: या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला ₹६,००० तीन समान हप्त्यांमध्ये मिळतात.
- नमो शेतकरी योजना: पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त ₹६,००० तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात.
पुढील हप्ता कधी मिळणार?
- २०वा हप्ता (पीएम किसान): एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीतील २०वा हप्ता जून २०२५ मध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
- ७वा हप्ता (नमो शेतकरी): पीएम किसान योजनेचा २०वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळेल, त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा ७वा हप्ता अदा करण्यात येणार आहे.
- आणि पुढील सातवा हप्ता रक्कम मंजूर करण्यात आलेली असून लवकरच हा हप्ता शेतकऱ्यांचे बँकेत हस्तांतरित करण्यात येणार आहे.
- हि रक्कम 15 सप्टेंबर च्या अगोदर सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अशी माहिती सर्व प्रसार माध्यमांमध्ये पसरली की पाहायला मिळते आहे.
या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे, ज्यामुळे शेती संबंधित कामांसाठी त्यांना मदत होते.